भारताची चिंता मिटली ! होर्मुजचा मार्ग खुला! ! इराणच्या मंत्र्यांची घोषणा अन्‌‍‍ मध्यपूर्वेतील गणिते बदलली

Foto
नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी समजली जाणारी होर्मुजची सामुद्रधुनी इराणने शत्रू राष्ट्रांसाठी बंद केली असतानाच, भारतासाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, भारत हा इराणच्या 5 सर्वात जवळच्या मित्र देशांपैकी एक असून भारतीय जहाजांना या मार्गावरून सुरक्षित प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केल्यानंतर इराणने आपली भूमिका स्पष्ट केली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुजमधून जाताना चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना कोणताही अडथळा येणार नाही. ङ्गङ्घआमच्या नजरेत हा मार्ग सर्वांसाठी बंद नाही. आम्ही आमच्या मित्रांसाठी मार्ग मोकळा ठेवला आहे, पण शत्रूंना तेलाचा एक थेंबही येथून नेऊ देणार नाही,ङ्घङ्घ असं अब्बास अराघची म्हणाले. तर अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांशी संबंधित जहाजांना शत्रू मानले जाणार आहे. त्यांच्यासाठी हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. ज्या देशांनी इराणविरुद्ध कोणत्याही आक्रमक कारवाईत सहभाग घेतलेला नाही, त्यांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी असेल. यासाठी इराणच्या नौदलाशी समन्वय साधणे अनिवार्य आहे.

भारताचे मोठे यश आणि ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा
मध्यपूर्वेतील संकटामुळे भारताचे 18 जहाजे होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात अडकून पडले होते. मात्र, भारताच्या यशस्वी कूटनीतीमुळे पेट्रोलियम पदार्थ घेऊन येणारी 4 जहाजे आधीच सुखरूप बाहेर पडली असून, 5 अधिक जहाजे लवकरच भारतात पोहोचतील. या कठीण काळात भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले आहे. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आणि ओमानच्या आखातात 5 हून अधिक आघाडीच्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. एलपीजी, एलएनजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी भारतीय नौदल कवच बनून भारतीय मालवाहू जहाजांना एस्कॉर्ट करत आहे.

होर्मुज सामुद्रधुनीची महत्त्वाची का?
जगातील एकूण तेल पुरवठ्याचा सुमारे 20 टक्के हिस्सा याच 33-39 किमी रुंद मार्गावरून जातो. आखाती देशांतून तेल निर्यातीसाठी हा एकमेव जलमार्ग आहे जो पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडतो. इराण-अमेरिका संघर्षामुळे हा मार्ग अंशतः बंद झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी पडझड आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानचा उल्लेख दलाल राष्ट्र असा?
दरम्यान, बुधवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने मध्य पूर्व संकटावर चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले असून, पाकिस्तानला दलाल राष्ट्र म्हटलं गेल्याचे सांगितले जात आहे.